डेहराडून– बाबा रामेदव यांनी कोरोनावरील कथित उपचारासाठी तयार केलेले 'कोरोनील' वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेे. त्यानंतर सारवासारव करत योगगुरू बाबा रामदेव यांनी आयुष मंत्रालयाच्या औषधाबाबतच्या शंका दूर करण्यात येईल, असा दावा केला आहे. संवादामध्ये त्रुटी दूर करण्यात येईल, असेही बाबा रामदेव यांनी म्हटले.
प्लासिबोबाबतचे सर्व निकष आणि वैद्यकीय चाचण्या 100 टक्के पूर्ण करण्यात आल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले. याबाबतची सर्व माहिती मंत्रालयाला पूर्वीच पाठविण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
बाबा रामदेव यांनी पतंजली आयुर्वेदिक कंपनीच्या माध्यमातून आयुर्वैदिक औषध तयार केल्याचा दावा केला. त्यानंतर काही तासाच आयुष्य मंत्रालयाने रामदेव यांना औषधाची जाहिरात आणि प्रसिद्धी थांबविण्याची नोटीस पाठविली. पतंजलीने करण्यात आलेले दाव्यांचे परीक्षण करण्यात येईल, असेही आयुष्य मंत्रालयाने म्हटले आहे.
पतंजलीला पाठविलेल्या नोटीसमध्ये हे विचारले प्रश्न
पतंजलीकडून कोरोनावर आयुर्वेदिक औषध तयार केल्याची माहिती आयुष मंत्रालयाकडून घेतली जात आहे. दाव्यांबाबतची वस्तुस्थिती आणि वैज्ञानिक माहितीबाबतचा अभ्यास मंत्रालयाला माहित नसल्याचे आयुष्य मंत्रालयाने पतंजलीला पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी कोणत्या घटकांचा वापर केला, त्याच्या संशोधनाचे परिणाम, कोणत्या रुग्णालयात संशोधन केले, याची माहिती देण्याची आयुष मंत्रालयाने पतंजलीला सूचना केली आह. कंपनीने इन्स्टिट्यूशनल इथिक्स कमिटीकडून ना हरकत परवाना मिळविला आहे का व वैद्यकीय चाचण्यांकरता कोठे नोंदणी केली होती, अशी प्रश्नांची सरबत्तीच आयुष मंत्रालयाने केली आहे.
दरम्यान, रामदेव यांनी कोरोनील आणि स्वसारी हे औषध कोरोना रुग्णांना सात दिवसात बरे करत असल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी 100 टक्के हमी दिली होती. दुसरीकडे जगभरातील वैज्ञानिक कोरोनावरील औषध शोधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. त्यासाठी अनेक चाचण्यांच्या फेऱ्यांमधून विविध औषधे जात आहेत. अशातच पतंजलीने अल्पकाळात कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केल्याने वैद्यकीय जगतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.