चेन्नई,भुवनेश्वर,नवी दिल्ली - कांदा खरेदी करणे लोकांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे. दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांद्याची किंमत ही प्रतिकिलो १०० रुपयांवर पोहोचली आहे. कांदा उत्पादक राज्यांपासून लांब अंतर असललेल्या दिल्लीसह चेन्नई शहरात कांद्याचे दर सर्वात अधिक झाले आहेत.
कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाहीत, तर काही शहरात आणखी दर वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये नवी दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी आणि भुवनेश्वर शहरांचा समावेश आहे. देशभरात असे एकही शहर नाही, जिथे कांद्याचे दर वाढलेले नाहीत.
दिल्लीत १ ऑक्टोबरला कांद्याचा दर प्रति किलो ५५ रुपये एवढा होता. त्यानंतर कांद्याचे दर आठवडाभरात ४५ टक्क्यांनी वाढून ८० रुपये प्रति किलो झाले आहेत. प्रत्यक्षात दुकानांसह इतर किरकोळ बाजारात कांदा ९० ते १०० रुपये किलो दराने विकला जात आहे. हीच परिस्थिती चेन्नईमध्ये आहे. केंद्र सरकारने प्रयत्न करूनही कांद्याचे दर आटोक्यात राहिले नाहीत.
हेही वाचा-विजय मल्ल्या 'कर्जबुडवा'; आयडीबीआयने केले जाहीर
या कारणाने कांद्याच्या किंमती वाढत आहेत -
कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मुसळधार वृष्टी झाली आहे. त्याचा फटका तेथील कांदा पिकाला बसल्याने दिल्लीसह इतर शहरात होणारी कांद्याची आवक घटली आहे. देशातील कांद्याचे उत्पादन घटल्याने केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार सर्व पाऊले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. पासवान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कांदे पुरवठा, मागणी आणि किमतीबाबतची माहिती घेतली आहे.
हेही वाचा-शेअर बाजाराचा नवा विक्रम; निर्देशांक वधारून पोहोचला ४०,४६९.७८ वर
निर्यातीवर निर्बंध आणि आयातीच्या नियमात शिथीलता
केंद्र सरकारने कांदे निर्यातीवर बंदी घातली आहे. अफगाणिस्तान, इजिप्त, तुर्की आणि इराणमधून देशात कांदे आयात होण्यासाठी तेथील भारतीय राजदूत कार्यालयाची मदत घेण्यात येत आहे. देशात लवकरच ८० कंटेनर तर विविध समुद्री मार्गाने १०० कंटेनर येतील, अशी भारताला अपेक्षा आहे.