नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खासगी कंपन्यांना कोळशांच्या खाणीच्या उत्खननासाठी परवानगी देणार असल्याचे जाहीर केले. हे कोळशाच्या खाणीचे व्यवसायिकीकरण महसुलाच्या वाट्यावर आधारित असल्याची माहिती सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशातील ५० कोळशांच्या साठ्यांचे लिलाव करण्यात येणार आहेत. यामागे कोळशाची विदेशामधून आयात कमी करण्याचा उद्देश आहे. तसेच देशातील कोळशाच्या उत्पादनात सरकारने आत्मनिर्भरता वाढविण्याचा प्रयत्न आहे. केंद्र सरकार कोळसा उद्योगातील पायाभूत सुविधांसाठी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कोळशाचे गॅसिफिकेशन आणि लिक्विफेकशन करण्यासाठी सवलती देण्यात येणार आहे. कोल बेड मिथेनच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.