महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जाणून घ्या, सोन्याच्या खरेदीबाबत 'हा' होणार आहे महत्त्वाचा बदल

सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण करण्याला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने १ ऑक्टोबरला मंजुरी दिल्याचे सांगताना आनंद होत असल्याचे रामविलास पासवान यांनी सांगितले. अंमलबजावणी करण्यापूर्वी डब्ल्यूटीओसंदर्भात तांत्रिक मुद्दा असल्याचेही त्यांनी सांगितले.

By

Published : Oct 5, 2019, 7:02 PM IST

प्रतिकात्मक

नवी दिल्ली - तुम्ही सणानिमित्त सोन्याची खरेदी करणार असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी शुद्धतेचे प्रमाणीकरण बंधनकारक करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मात्र, हा निर्णय जागतिक व्यापारी संघटनेला माहिती दिल्यानंतर लागू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी माध्यमांना सांगितले.

सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण करण्याला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने १ ऑक्टोबरला मंजुरी दिल्याचे सांगताना आनंद होत असल्याचे रामविलास पासवान यांनी सांगितले. अंमलबजावणी करण्यापूर्वी डब्ल्यूटीओसंदर्भात तांत्रिक मुद्दा असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या, देशात ८०० शुद्धतेचे प्रमाणीकरणाचे केंद्र आहेत. केवळ ४० टक्के सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण करण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा-मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका; बॉश ३० दिवस उत्पादन करणार बंद

जागतिक व्यापारी संघटनेच्या नियमानुसार एखाद्या वस्तुच्या गुणवत्तेबाबत मानकात बदल करताना सदस्य देशाने त्या निर्णयाची माहिती कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी दोन महिने लागतात.

काय आहे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण

सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण (हॉलमार्किंग) हे मौल्यवान धातुच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र आहे. त्यासाठी सध्या ऐच्छिक पद्धतीने सराफांकडून प्रमाणपत्र घेण्यात येते. ग्राहक व्यवहार मंत्रालयातर्गंत असलेल्या भारतीय मानक संस्था (बीआयएस) ही शुद्धतेचे प्रमाणपत्र देणारी प्रशासकीय संस्था आहे. या संस्थेकडून १४ कॅरट, १८ कॅरट आणि २४ कॅरट अशा तीन श्रेणीत सोन्याचा दर्जाचा निश्चित करण्यात येतो.

हेही वाचा-व्यवसायाकरिता सण ठरला चांगला 'मुहूर्त'; शाओमीच्या ५३ लाख स्मार्टफोनची विक्री

जगात सर्वात अधिक सोन्याची भारतात आयात केली जाते. साधारणत: दरवर्षी ७०० ते ८०० सोन्याची आयात करण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details