महाराष्ट्र

maharashtra

कॉग्नीझंट कंपनी 1 लाख जणांना देणार नोकरी

By

Published : Jul 29, 2021, 3:50 PM IST

कॉग्नीझंट सॉफ्टवेअर कंपनीकडून कोरोनाच्या काळातही चांगल्या नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. त्याबाबत सविस्तर वाचा.

नोकरी
नोकरी

नवी दिल्ली - तुम्ही सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही महत्त्वाची बातमी आहे. कॉग्नीझंट कंपनी सुमारे 1 लाख जणांना नोकरी देणार आहे.

कॉग्नीझंट सॉफ्टवेअर कंपनीचे जूनच्या तिमाहीत 41.8 टक्क्यांनी उत्पन्न वाढले आहे. हे उत्पन्न सुमारे 3,801.7 कोटी रुपये आहे. त्यानंतर कंपनीने रोजगार वाढविण्यासंदर्भात शुभवार्ता दिली आहे. कॉग्नीझंट कंपनीचे भारतात 2 लाख कर्मचारी आहेत.

हेही वाचा-शेतकऱ्याच्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार पूर्ण; सचिन तेंडुलकरने केली मदत

कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी जॅन सायगमंड म्हणाले, कंपनीच्या आयटी सेवेसह आणि बीपीओ कंपनीत कर्मचारी कार्यरत आहेत. जून तिमाहीअखेर दोन्ही कंपनीमध्ये 3 लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. आम्ही कर्मचाऱ्यांचे कौशल्य विकसन व बढती अशा विविध गोष्टींकडे लक्ष देत आहोत. कंपनी 2021 मध्ये 30 हजार नवपदवीधर आणि 2022 मध्ये 45 हजार नवपदवीधरांना सेवेत घेणार आहे.

हेही वाचा-60 वर्षांपासून 'चहासह कॉलेजच्या आठवणींचा गोडवा जोपासणारी भावंडे'

टीसीएस ४० हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देणार

नुकतेच सॉफ्टवेअर निर्यातीत आघाडीची कंपनी असलेल्या टीसीएसने चालू आर्थिक वर्षात कॅम्पसमधून ४० हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचे जाहीर केले आहे. टीसीएस ही खासगी क्षेत्रात कर्मचारी असलेली सर्वात मोठी कंपनी आहे. टीसीएसचे देशभरात ५ लाख कर्मचारी आहेत. मागील वर्षात कंपनीने ४० हजार पदवीधरांना कॅम्पसमधून नोकऱ्या दिल्या आहेत. यंदा आणखी विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार असल्याचे टीसीएसचे जागतिक मानवी संसाधन प्रमुख मिलींद लक्कड यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details