नवी दिल्ली - चलो कुछ आज कुछ तुफानी करें, अशी जाहिरात करणाऱ्या कोका कोला इंडियाने कोरोनाच्या लढ्यात भरीव मदत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोका कोला कोरोनाच्या लढ्याविरोधात मदत करण्यासाठी १ अब्ज रुपये देणार आहे.
कोरोनाच्या संकटात दिलासा देण्याकरता देशातील १० लाख लोकांहून अधिक लोकांना मदत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे कोका कोलाने म्हटले आहे. देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी तातडीने मदत करण्यात येणार असल्याची कंपनीने ग्वाही दिली आहे. यामध्ये कोरोना चाचणीची सुविधा व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीईची सुविधा आदींचा समावेश आहे. याशिवाय विविध एनजीओ आणि बॉटलिंग भागीदांराबरोबर करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामध्ये स्थलांतरित मजूरांना जेवण आणि पिण्याच्या बॉटल यांचा समावेश आहे.