मुंबई- पुरामध्ये कोल्हापूर आणि सांगलीमधील व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा व्यापाऱ्यांना प्राप्तिकर व जीएसटी भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुरग्रस्त व्यापाऱ्यांचे कर्ज पुनर्गठन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, व्यापाऱ्यांना प्राप्तिकर भरण्यासाठी मुदत वाढ मिळण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विनंती करण्यात येणार आहे. तसेच जीएसटी भरण्यासाठी व्यापाऱ्यांना मुदतवाढ मिळावी, यासाठी जीएसटी परिषदेला विनंती करण्यात येणार आहे.