महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सिप्लाच्या नफ्यात चौथ्या तिमाहीत ७३ टक्क्यांची वाढ - cipla Total revenue

सिप्लाने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये २,३८९ कोटी रुपये निव्वळ नफा मिळविला होता. तर आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये निव्वळ नफा २,३८९ कोटी रुपये निव्वळ नफा मिळविला होता.

सिप्ला
सिप्ला

By

Published : May 15, 2021, 5:35 PM IST

नवी दिल्ली - सिप्ला कंपनीचा चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा ७३ टक्क्यांनी वाढून ४१२ कोटी रुपये झाला आहे. मुंबईस्थित सिप्लाने जानेवारी २०१९ ते मार्च २०२० दरम्यान २३८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला होता. कोरोना महामारीत औषधांची मागणी वाढल्याने सिप्लाच्या नफ्यात वाढ झाली आहे.

सिप्ला कंपनीने आर्थिक कामगिरीची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. या माहितीनुसार कंपनीने मागील आर्थिक वर्षात ४,६०६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. तर त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात कंपनीने ४,३७६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला होता. सिप्लाने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये २,३८९ कोटी रुपये निव्वळ नफा मिळविला होता. तर आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये निव्वळ नफा २,३८९ कोटी रुपये निव्वळ नफा मिळविला होता. देशामधील औषध विक्रीच्या व्यवसायात ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दक्षिण आफ्रिकेतील औषध विक्रीच्या व्यवसायात १० टक्क्यांची वाढ झाली आहे.

हेही वाचा-जिओ फोनकडून धमाकेदार ऑफर; दर महिन्याला मिळणार ३०० मिनिटे मोफत कॉलिंग

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात लढाई सुरुच ठेवणार-

सिप्लाचे एमडी आणि जागतिक सीईओ उमंग व्होरा म्हणाले, की कंपनी ही देशाच्या पाठिशी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात लढाई सुरुच ठेवणार आहोत. कोरोनाच्या लढ्यात आम्ही केंद्रस्थानी आहोत. अथकपणे आम्ही जीवनावश्यक औषधे पुरविण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत. कोरोना औषधांचे उत्पादने वाढविली आहेत. तसेच देशात कोरोनावरील नवसंशोधनाचे उपचार आणण्यासाठी जागतिक आणि सरकारी यंत्रणेबरोबर भागीदारी केली आहे.

हेही वाचा-महामारीत भारतीय औषधी उद्योगाच्या वृद्धीदरात ५९ टक्क्यांची वाढ

प्रति शेअर ५ रुपये लाभांश जाहीर

कंपनीने वर्ष २०२०-२१ साठी प्रति शेअर ५ रुपये लाभांश जाहीर केला आहे. गतवर्षी सिप्लाला डीसीजीआयकडून फेवेपिरावीर हे औषध सिप्लेन्झा नावाने उत्पादन करण्याची मंजुरी दिली होती. सिप्लाकडून रेमडेसिवीरचेही उत्पादन घेतले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details