नवी दिल्ली- मुंबईमधील वीजपुरवठा बंद पडण्यामागे चीनमधील हॅकर असल्याचे समोर येत असतानाच दुसरी धक्कादायक बाब समोर आली आहे. रशिया आणि चीनशी संबंधित असलेल्या हॅकरने गेल्या काही आठवड्यात कोरोना लशीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला लक्ष्य केले होते. ही माहिती सायबर गुप्तचर संघटना सायफर्मा कंपनीने अहवालात दिली आहे.
हॅकिंग करणारी मोहिम ही उत्तर कोरियामधून चालविले जात असल्याचे सायफर्माने म्हटले आहे. हॅकिंग करणाऱ्या /e गटाने यापूर्वी योग गुरू रामदेव पतंजली ग्रुपला लक्ष्य केले होते. सिंगापूर आणि जपान येथील सायफर्माला गोल्डमॅन सॅच्स आणि झेड ३ पार्टनर या कंपन्यांचे समर्थन आहे. सायफर्माने नुकतेच औषधी कंपन्यांना निर्माण झालेल्या धोक्यावर अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा २४१ रुपयांची वाढ
काय म्हटले आहे अहवालात?
- सायबर हल्ले हे रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि मध्य पूर्वेसह १२ देशांमधून करण्यात आले आहेत. हे हल्ले भारतीय कोरोना लशीबाबतचे संशोधन, पेटंट माहिती, वैद्यकीय चाचण्यांची आकडेवारी आदी माहिती चोरण्यासाठी करण्यात आले होते.
- सायबर हल्ल्यांमध्ये भारत, अमेरिका, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया, स्पेन, इटली, जर्मनी, ब्राझील, तैवान आणि मेस्किको या देशांतील औषधी कंपन्यांचा समावेश आहे.
- सायफार्माच्या अहवालानुसार सायबर हल्ल्याच्या १५ मोहिमा अजूनही सुरू आहेत.
- आपण ज्या पद्धतीने काम करतो आहोत, त्यामध्ये मोठा बदल हा कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे आपण काम करण्यासह जगण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. आरोग्य क्षेत्रासह औषधी कंपन्या प्रकाशझोतात आल्या आहेत.
- जेव्हा जग पूर्वस्थितीला येण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा सायबर गुन्हेगार हे डार्क वेबचा वापर करून भीतीच्या वातावरणात फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे अहवालात म्हटले आहेत. सायबर हल्ल्याच्या मोहिमेमधून संवेदनशील वैयक्तिक माहिती चोरणे, ग्राहकांची माहिती चोरणे त्यामधून आर्थिक फायदा मिळविण्याचा हेतू असल्याचे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा-एलपीजी गॅसमध्ये आणखी २५ रुपयांची दरवाढ; एका महिन्यांदा चौथ्यांदा महागाईचा चटका