महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

महाराष्ट्राच्या कोरोना लढ्यात चीनच्या 'या' कंपनीचे योगदान; महाराष्ट्राला दिले ६ लाख मास्क - आरोग्यमंत्री राजेश टोपे

सॅनी ग्रुपचे उपाध्यक्ष आणि सॅनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक यांनी १४ मे रोजी ६ लाख मास्क हे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. सध्या, ६ लाख मास्क हे सरकारी हाफकिन बायोफार्मा कंपनीत पोहोचले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे व सॅनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक
आरोग्यमंत्री राजेश टोपे व सॅनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक

By

Published : May 16, 2020, 8:40 PM IST

नवी दिल्ली- भारताच्या कोरोना लढ्याला मदत करण्यासाठी चीनच्या सॅनी ग्रुपने मोठी मदत केली आहे. सॅनी ग्रुपने महाराष्ट्राला १० लाख मास्क दिले आहेत.

महाराष्ट्र सरकारने संरक्षण साधनांसाठी सॅनी हेवी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष वेनबो शियाँग यांना पत्र लिहिले. त्यानंतर कंपनीने भारतीय दुतावास कार्यालय आणि चीनच्या दुतावास कार्यालयाच्या सहकार्याने मास्क विमान मार्गे मुंबईत पाठविले आहेत. त्यासाठी लागणारे उत्पादन शुल्कही देण्यात आले आहे.

सॅनी ग्रुपचे उपाध्यक्ष आणि सॅनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक यांनी १४ मे रोजी ६ लाख मास्क हे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. सध्या, ६ लाख मास्क हे सरकारी हाफकिन बायोफार्मा कंपनीत पोहोचले आहेत.

हेही वाचा-'कोळशाच्या खाणींचे व्यवसायिकीकरण महसुलाच्या वाट्यावर आधारित'

दरम्यान, देशातील कोरोना बाधितांची संख्या ८५ हजार ९४० झाली आहे. भारतामधील कोरोना रुग्णांची संख्या ही चीनमधील रुग्णांच्या संख्येहून अधिक झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्येत भारत जगात ११ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हेही वाचा-बिगर वैद्यकीय मास्कच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details