वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी सौद्यावरून चीनवर निशाणा साधला आहे. अमेरिकन अध्यक्ष निवडणुकीपर्यंत चीन व्यापारी सौदा लांबणीवर टाकत असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. आगामी निवडणुकीत आपली पुन्हा निवड होणार नाही, असे चीनला वाटते. तेव्हा डेमोक्रॅटिक पक्षाबरोबर सौदा (डील) करणे सोपे जाईल, असे चीनचे धोरण असल्याचे ट्रम्प माध्यमांशी बोलताना म्हणाले.
चीनकडून व्यापारी सौदा अमेरिकन अध्यक्ष निवडणुकीपर्यंत लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न -ट्रम्प - डेमोक्रॅटिक पक्ष
सौदा कसा करायचा हे चीनवर अवलंबून असणार आहे. जरी हा सौदा झाला नाही तरी ठीक! कारण अब्जावधी डॉलर हे चीनमधून अमेरिकेत आणले जात आहेत. त्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे, याकडेही डोनाल्ड ट्रम्प यांनी लक्ष वेधले.
चीनबरोबरील व्यापारी तोडग्याबाबत माध्यमांनी विचारले असता, डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, चीनचे वाट पाहण्याचे धोरण आहे, असे मला वाटते. कदाचित चीन १४ ते १५ महिन्यापर्यंत वाट पाहील, अशी त्यांनी शक्यता वर्तविली. त्यांनी करारावर सह्या केल्या की आपण लगेच जिंकणार आहोत. ते त्यांच्या देशासाठी निर्णायक सौदा करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. सौदा कसा करायचा हे चीनवर अवलंबून असणार आहे. जरी हा सौदा झाला नाही तरी ठीक! कारण अब्जावधी डॉलर हे चीनमधून अमेरिकेत आणले जात आहेत. त्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, अमेरिकचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लिथिझर आणि खजिनदार, सचिव म्युचिन हे पुढील आठवड्यात शांघायच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते चीनबरोबर व्यापारी विषयावर चर्चा करणार आहेत.