बीजिंग- अमेरिका आणि चीनमध्ये आयात शुल्कावरून व्यापारी युद्ध पेटले आहे. या व्यापारी युद्धाने अमेरिकेला 'पुन्हा महान होण्यात यश मिळविणे' शक्य झाले नसल्याची टीका चीनने केली आहे. व्यापारी वादावर तोडगा निघावा, अशी इच्छा आहे. मात्र त्यासाठी तत्वांशी तडजोड करणार नसल्याचे चीनने श्वेतपत्रिकेत म्हटले आहे.
व्यापारी वादात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान - चीन
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाल्याची श्वेतपत्रिका चीनने प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाल्याची श्वेतपत्रिका चीनने प्रसिद्ध केली आहे.
काय म्हटले आहे श्वेतपत्रिकेत-
व्यापार वादामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकेतील उत्पादनांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यातून तेथील वस्तुंच्या किंमती वाढल्या आहेत. या बाबी अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीसाठी धोकादायक असल्याचेही चीनने म्हटले आहे.
चीनने अमेरिकेला दिले प्रत्युत्तर-
चीनने शनिवारी अमेरिकेतून आयात होणाऱ्या ६० अब्ज डॉलर मुल्यांच्या उत्पादनांवरील आयात वाढविले आहे. हे आयातशुल्क ५ टक्क्यावरून २५ टक्क्याने करण्यात आले आहे. यापूर्वी अमेरिकेने चीनच्या २०० अब्ज डॉलर मुल्यांच्या उत्पादनांवर २५ टक्के आयात शुल्क लागू केले होते. याल प्रत्युत्तर म्हणून चीननेदेखील 'जशास तसे' या तत्वानुसार प्रत्युत्तर दिले आहे