बीजिंग -कोरोनावरील प्रभावी लस अद्याप जगात तयार झाली नाही. असे असले तरी चीनमधील कंपन्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात येत आहे. यामध्ये कोरोनाच्या लसीची मानवी चाचणी करणाऱ्या संशोधकांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांत आपत्कालीन परिस्थितीमध्ये संशोधकांनी कोरोनाची लस अनेकांना दिली आहे.
चीनच्या आरोग्य विभागाने म्हटले की, मोठ्या प्रमाणात रोगाचे उच्चाटन करण्यात आले आहे. पुन्हा रोगाची लागण होऊ नये, यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, चीनबाहेरील तज्ज्ञांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनमध्ये विषाणू नसेल तर, लसीचा आपत्कालीन वापर करण्याची काय गरज आहे, असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. चीनमध्ये किती जणांनी कोरोनाची लस दिली आहे, ही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
हेही वाचा-अमेरिकेत टिकटॉकची ओरॅकल, वॉलमार्टशी भागीदारी; 25 हजार अमेरिकन लोकांना नोकऱ्या
चीनची सरकारी कंपनी सिनोफार्मची कंपनी सीएनबीजीने 3 लाख 50 हजार लोकांना कोरोनाची लस मानवी चाचण्याच्या टप्प्यानुसार दिल्या आहेत. तर 40 हजार लोकांनी नोंदण्या केल्याचे सीएनबीजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.