नवी दिल्ली– सीमारेषेवरून तणावाची स्थिती असताना चीनने भारताकडून विक्रमी पीव्हीसी पाईपची आयात केली आहे. चीनने जुनमध्ये भारताकडून 27 हजार 707 मेट्रिक टन पीव्हीसीची पाईप आयात केली आहे.
चीनकडून होणाऱ्या आयातीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. अशातच चीनमधून होणाऱ्या पीव्हीसीच्या आयातीचे प्रमाण वाढले आहे. चीनने भारताकडून मे महिन्यात 5 हजार 174 मेट्रिक टन पीव्हीसी पाईपची आयात केली होती. त्याच्या तुलनेत जूनमध्ये सुमारे पाचपट पीव्हीसी पाईपची आयात चीनने केली असल्याचे ग्लोबल रबर मार्केटने म्हटले आहे.
टाळेबंदीत भारतामधून आयात होणाऱ्या पीव्हीसी पाईपच्या प्रमाणात घसरण झाली आहे. अनेक देशांनी पीव्हीसी पाईपच्या ऑर्डर रद्द केल्या आहेत.