नवी दिल्ली - केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाने चिकण खाणे सुरक्षित असल्याचा खुलासा केला आहे. चिकनमुळे कोरोना विषाणू पसरत असल्याचा कोणताही पुरावा समोर पुढे आला नसल्याचे पशुसंवर्धन मंत्रालयाने म्हटले.
पशुसंवर्धन मंत्रालयाचे आयुक्त प्रविण मलिक यांनी कुक्कुटपाल महामंडळाचे सल्लागार विजय सरदाना यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी चिकनमधून माणसांमध्ये कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जगभरात कुठेही आढळले नसल्याचे म्हटले आहे. सरदाना यांनी याबाबत ई-मेलवरून प्रविण मलिक यांना प्रश्न विचारला होता. जागतिक प्राणी आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार कोरोना विषाणुचा केवळ माणसातून माणसांना संसर्ग होतो. कोरोनाचा संसर्ग होताना कोणत्याही प्राण्याचा स्त्रोत आढळलेला नाही.
हेही वाचा- कोरोनाचे थैमान : मृतांची संख्या ८०० वर, सार्सच्या बळींचा आकडा ओलांडला