नवी दिल्ली- जगभराच्या तुलनेत पाकिस्तानातील मोबाईल उद्योग सरासरीच्या तुलनेत मागे आहे. असे असले तरी स्वस्त असलेल्या चिनी स्मार्टफोनचा पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. भारतीय हवाईदलाचे अधिकारी अभिनंदन वर्थमान यांचे फोटो व व्हिडिओ पाकिस्तानातून सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातून दोन्ही देशामध्ये राजकीय तणाव निर्माण झाले.
चिनी मोबाईल कंपन्यांचे पाकिस्तानातील स्मार्टफोनच्या ६२ टक्के बाजारपेठेवर वर्चस्व आहे. वेगाने वाढणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेत चिनी कंपन्यांनी स्मार्टफोनची ५५ टक्के बाजारपेठ व्यापली आहे.झाँग ही चिनी मोबाईल कंपनी ही पाकिस्तानमधील ४ जी नेटवर्कमधील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यानंतर टेलिनॉर, जाझ आदी कंपन्यांचा क्रमांक लागतो. पाकिस्तानमधील एकूण विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनपैकी निम्म्या स्मार्टफोनची किंमत ही ७ हजार रुपयाहून कमी आहे. पाकिस्तानच्या मोबाईल ऑपरटेर कंपन्यांच्या परवान्यांची मुदत संपत आल्याने त्यांची चिंता वाढली आहे. गतवर्षी मोबाईल ऑपरेटर कंपन्यांच्या परवान्यांना मुदतवाढ देताना पाकिस्तान सरकारने उशीर केला होता. यंदा असा उशीर झाल्यास पाकिस्तानमधील मोबाईल ऑपरेटर सेवा आणि ग्राहकांच्या संख्येवर परिणाम होईल, असे पाकमधील एका माध्यमाने म्हटले आहे.
As per the Counterpoint 2018 tracker, Samsung led the market in 2018 with a share of 22 per cent, followed by Huawei at 19 per cent, OPPO at 17 per cent and Qmobile at 15 per cent.
Motorola, Nokia, Apple and LG are other smartphone brands in Pakistan.