नवी दिल्ली - टाळेबंदीत शेतकामाला परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी शेतमालाची वाहतूक करण्याकरता शेतकऱ्यांना वाहने मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यावर उपाय म्हणून केंद्रीय कृषी मंत्रालयाने 'किसान रथ' अॅपचे लाँचिंग केले आहे.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज किसान रथ अॅपचे लाँचिंग केले आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना आवशक्यता असलेल्या वाहनांची पोस्ट करावी लागणार आहे. त्यांनतर त्यांना विविध वाहनांच्या अॅप अॅग्रिगेटरकडून उपलब्ध वाहन व त्याचे भाडे यांची शेतकऱ्यांना माहिती दिसू शकणार आहे.