नवी दिल्ली - राजधानीत कांद्याचे भाव कडाडल्याने ८० रुपये प्रति किलोने कांदे विकले जात आहेत. कांदे आयातीवर लागू असलेले काही नियम शिथील करण्यात येणार असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यानंतर अफगाणिस्तान, इजिप्त, तुर्की आणि इराणधील कांद्याची देशात सुलभतेने आयात होणे शक्य होणार आहे.
कांदे आयातीचे नियम शिथील करण्याचा निर्णय आंतरमंत्रिय समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षपदी ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव अविनाश श्रीवास्तव हे होते. यावेळी त्यांनी देशातील कांद्याच्या किमतीचा आढावा घेतला. येत्या काही दिवसात कांद्याच्या पुरवठ्यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. देशात तातडीने कांद्याचे ८० कंटेनर आणि त्यानंतर सागरी मार्गाने १०० कंटेनर येणे अपेक्षित असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा-स्थावर मालमत्ता क्षेत्राला पॅकेज देण्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून संकेत