नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य मंत्राल हैदराबादमधील लस उत्पादक बायॉलिजीकल-ई कंपनीकडून ३० कोटी रुपयांची कोरोना लस खरेदी करणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून कंपनीला आगाऊ १,५०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
बायॉलिजीकल-ई कंपनीकडून केंद्र सरकारला चालू वर्षात ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत लशींचे डोस देण्यात येणार आहेत. सध्या बायोलॉजिकल -ई ही कोरोना लस वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. यापूर्वी पहिली व दुसऱ्या वैद्यकीय चाचणीचे परिणाम समाधानकारक आले आहेत. ही लस आरबीआटी प्रोटीनचा उपघटक आहे. बायॉलिजीकल-ई ही कोरोना लस येत्या काही महिन्यांत उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा-आर्थिक दुर्बल घटकांच्या लसीकरणाकरिता मलबार गोल्डकडून ८ कोटींची मदत
तज्ज्ञांच्या शिफारशीवरून केंद्राने केली खरेदी
बायोलॉजीकल- ईच्या प्रस्तावाचे परीक्षण कोव्हिड-१९ वरील नॅशनल एक्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशनकडून करण्यात आले. त्यांनतर या तज्ज्ञांच्या समितीने लशीची केंद्र सरकारला शिफारस केली आहे.
हेही वाचा-पी. चिदंबरम यांच्या जीडीपीवरील टीकेला अनुराग ठाकूर यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
केंद्र सरकारकडून स्वदेशी लसनिर्मितीला प्रोत्साहन-
केंद्र सरकारकडून स्वदेशी लशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून बायोलिजिकल-ईला संशोधन, विकास यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येत आहे. जैवतंत्रज्ञान विभागाने केवळ १०० कोटींची आर्थिक मदत नव्हे तर भागीदार म्हणूनही बायोलॉजिकल-ई कंपनीला संशोधनासाठी मदत करणार आहे. केंद्र सरकारने कोव्हिड-१९ लस विकास मोहिम आणि मिशन कोव्हिड सुरक्षेंतर्गत कोरोना लस निर्मितीला चालना दिली आहे. तसेच यापूर्वी आत्मनिर्भर भारत योजनेलाही प्रोत्साहन दिले आहे.
हेही वाचा-नवीन आयटी कायदा सर्च इंजिनला लागू होत नाही- गुगलचा दिल्ली उच्च न्यायालयात युक्तिवाद
बायॉलिजीकल-ई ठरणार दुसरी स्वदेशी कोरोना लस
कोव्हॅक्सिन ही भारत बायोटेकने विकसित केलेली पहिली स्वदेशी कोरोना लस आहे. बायॉलिजीकल-ई या कंपनीच्या लशीच्या सर्व वैद्यकीय चाचण्या यशस्वी ठरल्या तर ही देशातील दुसरी स्वदेशी कोरोना लस ठरणार आहे.