नवी दिल्ली- ऊसापासून साखरेऐवजी इथेनॉलची निर्मिती केल्यास केंद्र सरकार कारखान्यांना इथेनॉलवर हमीभाव देणार आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री व नैसर्गिक मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या बैठकीत आयडीबीआयच्या पुनर्भांडवलीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोलियम उत्पादनांची १० टक्के आयात कमी करण्याचे उद्दिष्ट यांनी निश्चित केले आहे. त्यानुसार इथेनॉलचा वापर वाढविण्यावर सरकार भर देणार आहे. सरकारने १० टक्के पेट्रोलियम उत्पादनाची आयात कमी केल्यास सरकारचे १ लाख कोटी रुपये वाचू शकणार आहेत. त्यासाठी २ दशलक्ष लिटर इथेनॉलचा वापर करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.