नवी दिल्ली - केंद्र सरकारने विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशांना वस्तू व सेवा कर (जीएसटी) मोबदलाकरिता १९,९५० कोटी रुपये वितरित केले आहेत. यानंतर केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटीचा मिळालेला एकूण मोबदला १.२ लाख कोटी रुपये झाला आहे.
राज्यांना मागील सोमवारी निधी देण्यात आल्याची माहिती वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. वस्तू व सेवा कर कायदा जुलै २०१७ मध्ये देशात लागू झाला आहे. व्हॅट तसेच अतिरिक्त कर लागू करता येत नसल्याने राज्यांना महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे जीएसटी लागू केल्यापासून पहिली पाच वर्षे केंद्र सरकार राज्यांना जीएसटी मोबदला देत आहे.