महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बी. व्ही. आर सुब्रमण्यम यांची केंद्रीय वाणिज्य सचिवपदी निवड - बी व्ही आर सुब्रमण्यम

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या आदेशानुसार बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांची वाणिज्य मंत्रालयात ओएसडी म्हणून नियुक्ती झाली आहे. कॅबिनेटच्या निवड समितीने सुब्रमण्यम यांच्या निवडीला मंजुरी दिली आहे.

मुख्य सचिव बी. व्ही. आर सुब्रमण्यम
मुख्य सचिव बी. व्ही. आर सुब्रमण्यम

By

Published : May 27, 2021, 9:13 PM IST

श्रीनगर- जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयात कर्तव्यावरील विशेष अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्ती झाली आहे. पुढील महिन्यात वाणिज्य सचिव अनुप वाधवान हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याजागी सुब्रमण्यम यांची नियुक्ती होणार आहे.

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या आदेशानुसार बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांची वाणिज्य मंत्रालयात ओएसडी म्हणून नियुक्ती झाली आहे. कॅबिनेटच्या निवड समितीने सुब्रमण्यम यांच्या निवडीला मंजुरी दिली आहे.

बी. व्ही. आर सुब्रमण्यम यांची केंद्रीय वाणिज्य सचिवपदी निवड

हेही वाचा-पेट्रोलच्या किमतीने ठाण्यात ओलांडला १०० रुपये प्रति लिटरचा टप्पा!

हे आहेत स्पर्धेत-

जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य सचिवपदाची जागा सुब्रमण्या यांच्या बदलीने रिक्त होत आहे. या जागेवर नियुक्तीसाठी सनदी अधिकारी प्रदीप कुमार, सुधांशु पांडे आणि अरुण कुमार मेहता हे स्पर्धेत आहेत. त्रिपाठी आणि पांडे यांनी केंद्र सरकारमध्ये सचिव म्हणून काम केले आहे.

हेही वाचा-राज्यात 111 लाख टन साखर शिल्लक राहणार; कारखाने आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता

मेहता यांना मुख्य सचिवपदासाठी सर्वाधिक पसंती-

मेहता यांचीही सचिवपदावर बढती झाली होती. ते सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये वित्त विभागात वित्त आयुक्त आहेत. मेहता यांचा प्रामाणिकपणा, मनमिळावूपणा आणि प्रशासकीय कामावरील पकड या कारणांनी त्यांची मुख्य सचिवपदी निवड होण्याला जास्त पसंती दिली जात आहे. ते कमी बोलणारे आणि जास्त काम करणारे अधिकारी असल्याचे केंद्रातील सूत्राने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details