नवी दिल्ली- नीरव मोदीच्या कंपनीनंतर आणखी एका कंपनीने सरकारी बँकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) फ्रॉस्ट इंटरनॅशनल कंपनी विरोधात ४ हजार ६१.२५ कोटी रुपयांची बँकांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. सीबीआयने मुंबईसह उत्तर प्रदेशमधील कंपनीची मालकी असलेल्या विविध ठिकाणी छापे टाकले आहेत.
फ्रॉस्ट इंटरनॅशनल ही मुंबईस्थित कंपनी विविध मालांची आयात आणि निर्यात करते. सीबीआयने दोन दिवसापूर्वी काही बँकेचे अधिकारी, १३ लोकांसह कंपनीविरोधात गुन्हा नोंदविला आहे. यामध्ये कंपनीचे प्रवर्तक उदय जयंत देसाई, सुजय उदय देसाई, सुनील लालचंद वर्मा आणि अनिल कुमार वढेरा, संचालक आणि कंपनीला जामीन देणारे व्यक्ती यांचा समावेश आहे.
हेही वाचा-केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध हटविणार?