महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

महामारीने स्टार्टअप कंपन्यांचे मोडले कंबरडे; 'कारदेखो'कडून कर्मचारी कपात

'कारदेखो'ने कर्मचाऱ्यांच्या वेतनात १२ ते १५ टक्के कपात केली आहे. तर वरिष्ठांच्या वेतनात ४५ टक्क्यापर्यंत कपात केली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : May 26, 2020, 3:00 PM IST

Updated : May 26, 2020, 3:38 PM IST

नवी दिल्ली - कोरोना महामारीने स्टार्टअप कंपन्या आर्थिक संकटात सापडले आहेत. वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या कारदेखो या स्टार्टअपने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. तसेच सुमारे २०० लोकांना कामावरून काढले आहे.

कोरोना महामारीने वाहन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या कारणाने कारदेखोकडून कंपनीचा खर्च वाचविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कारदेखोने अधिकृतपणे कर्मचारी कपातीची संख्या दिलेली नाही. मात्र, सुमारे २०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची शक्यता आहे. कोरोनाचा सगळ्याच उद्योगांना फटका बसला आहे. वाहन उद्योगाला सर्वात फटका बसल्याचे कारदेखोची मालकी असलेल्या गिरनारसॉफ्ट ग्रुपने म्हटले आहे. 'कारदेखो'ने कर्मचाऱ्यांच्या वेतनात १२ ते १५ टक्के कपात केली आहे. तर वरिष्ठांच्या वेतनात ४५ टक्क्यापर्यंत कपात केली आहे.

हेही वाचा-इंडिगोतील प्रवासी आढळला कोरानाबाधित; विमानातील सर्व विलगीकरणात!

स्टार्टअपमध्ये कर्मचारी कपात सुरू-

गेल्या काही आठवड्यांपासून उबेर, झोमॅटो आणि स्विग्गीने कर्मचारी कपात केली आहे. टाळेबंदीने मागणी कमी झाल्याने विविध स्टार्टअपच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. ओलाने १ हजार ४०० कर्मचाऱयांना कामावरून कमी केले आहे. तर शेअरचॅटने १०१ कर्मचाऱ्यांना नोकरीमधून कमी केले आहे.

हेही वाचा-नोकर कपातीचे संकट : लाईव्ह स्पेसच्या ४५० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

९० टक्के स्टार्टअपचे उत्पन्न घसरले- नॅसकॉम

नॅसकॉमने स्टार्टअपवरील अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये ९० टक्के स्टार्टअपचे उत्पन्न कमी झाल्याचे नॅसकॉमने म्हटले आहे. तर सुमारे ३० ते ४० टक्के स्टार्टअपने तात्पुरते काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. ७० टक्के स्टार्टअपने गेल्या तीन महिन्यांपासून महसूल मिळत नसल्याचे म्हटले आहे. प्रारंभिक अवस्थेमधील आणि मध्यम अवस्थेमधील स्टार्टअपला सर्वात मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनाने महसूल कमी झाल्याने सर्वच स्टार्टअपने नवीन नोकरभरती बंद केली आहे. तर आर्थिक संकटात तग धरून राहण्यासाठी स्टार्टअपने वेतन कपात आणि कर्मचाऱ्यांची कपात सुरू केली आहे.

Last Updated : May 26, 2020, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details