महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

व्यापारी संघटनेचे मुकेश अंबानींसह 50 उद्योगपतींना पत्र; 'ही' केली अपेक्षा - CAIT letter industrialists

सीएआयटीचे महासचिव प्रवीण खंडेलवाल म्हणाले, मुकेश अंबानी हेकी एक यशस्वी आंत्रेप्रेन्युअर आणि आघाडीचे उद्योगपती आहेत. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली उद्योगपतींना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Jun 24, 2020, 8:49 PM IST

नवी दिल्ली- व्यापारी संघटना सीएआयटीने रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यासह 50 प्रमुख उद्योगपतींना पत्र लिहिले आहे. या पत्रातून संघटने चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यासाठी मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. हे पत्र रतन टाटा, अझीम प्रेमजी, गौतम अदानी, अजय पिरामल, आनंद महिंद्रा आणि सुनिल भारती मित्तल यांना लिहिले आहे.

सीआयटीचे अध्यक्ष कुमार मंगलमम बिर्ला, विक्रम किर्लोस्कर, राहुल बजाज, शिव नडार,पलोनजी मिस्री, उदयक कोटक, नस्ली वाडिया, शशी रुईया, मधुकर पारेख, हर्ष मारिवाला, सतीश रेड्डी, पंकज पटेल या उद्योगपतींना पत्र लिहिले आहे. ‘भारतीय सन्मान हमारा अभियान’या मोहिमत सहभागी होण्याचे आवाहन व्यापारी संघटनेने उद्योगपतींना केले आहे.

काय म्हटले आहे संघटनेने पत्रात?

चीनने क्रुरपणे सीमारेषेवर हल्ला केला. त्या घटनेत 20 जवानांना वीरमरण आले. प्रत्येक भारतीयाच्या मनात चीनच्या कृत्यावविरोधात राग, नाराजी आणि घृणा आहे. चीनला केवळ सैन्यदलानेच नव्हे तर आर्थिक कारवाई करून प्रत्युत्तर द्यावे, अशी भारतीयांची भावना आहे. तुम्ही आणि तुमच्या संस्थेने भारतासाठी एकता आणि पाठिंबा दिला आहे. देशाच्या आधी काहीच नाही, हे दाखविण्याची वेळ आली आहे. तुम्ही पाठिंबा दिला तर उद्योगपतींना प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामधून ‘मेक इन इंडिया’ आत्मनिर्भर भारत घडेल, असे सीएआयटीने मुकेश अंबानी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

अंबानी हे भारतीय उत्पादनांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देवू शकतील, असा व्यापारी संघटनेने विश्वास दिला आहे. सीएआयटीचे महासचिव प्रवीण खंडेलवाल म्हणाले, मुकेश अंबानी हेकी एक यशस्वी आंत्रेप्रेन्युअर आणि आघाडीचे उद्योगपती आहेत. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली उद्योगपतींना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ही मोहिम भारताची क्षमता बदलून टाकणार आहे. भारत हा चीनचे सामर्थ्य कमी करून महाशक्ती होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. दरम्यान सीएआयटीने 450 प्रकारच्या 3 हजार चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे व्यापाऱ्यांना यापूर्वीच आवाहन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details