नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाने येस बँकेच्या फेररचना योजनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेचा ४९ टक्के हिस्सा घेण्याचा स्टेट बँक ऑफ इंडियाला मार्ग मोकळा होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, भारतीय रिझर्व्ह बँकेने सुचविलेल्या फेररचनेच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.