महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जाणून घ्या, दिवसभरातील व्यापार विषयक संक्षिप्त घडामोडी - संयुक्त राष्ट्रसंघ

बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या अद्याप अडचणीत आहेत. अशा स्थितीत भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना  शेवटचा आधार म्हणून भूमिका बजवावी, असे मत एसबीआयच्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.

Business news in Brief
व्यापार विषयक संक्षिप्त घडामोडी

By

Published : Jan 17, 2020, 7:45 PM IST

मुंबई - ह्युंदाई मोटर इंडियाने वाहनांच्या विक्रीसाठी ऑनलाईन वेबसाईट लाँच केली आहे. देशाचा आर्थिक विकासाचा दर हा २०२० मध्ये ६.६ टक्के राहील, असा संयुक्त राष्ट्रसंघाने अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर महागाईचा दर हा ४ टक्के राहील, असे संयुक्त राष्ट्रसंघाने अहवालात म्हटले आहे. अशा महत्त्वाच्या व्यापार विषयक संक्षिप्त घडामोडी, जाणून घ्या...

ह्युदांईची कार खरेदी करा ऑनलाईन! कंपनीकडून वेबसाईट लाँच

  • नवी दिल्ली - ह्युंदाई मोटर इंडियाने वाहनांच्या विक्रीसाठी ऑनलाईन वेबसाईट लाँच केली आहे. या वेबसाईटवरून पारदर्शी व सोप्या पद्धतीने कार खरेदी करणे शक्य होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-पियूष गोयल यांचा अ‌ॅमेझॉनच्या गुंतवणुकीवरून 'यू टर्न,' म्हणाले...

रिलायन्स इंडस्ट्रीजला तिसऱ्या तिमाहीत ११,६४० कोटींचा निव्वळ नफा

  • नवी दिल्ली- रिलायन्स इंडस्ट्रीजने तिसऱ्या तिमाहीत ११,६४० कोटींचा निव्वळ नफा कमविला आहे. रिलायन्सचे शेअर आज ३ टक्क्यांनी वधारले आहेत.

हेही वाचा-'टीसीएस'च्या नफ्यात तिसऱ्या तिमाहीत अंशत: वाढ

आरबीआयने बँकांना शेवटचा आधार म्हणून भूमिका बजवावी - एसबीआय

  • मुंबई - बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या अद्याप अडचणीत आहेत. अशा स्थितीत भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना शेवटचा आधार म्हणून भूमिका बजवावी, असे मत एसबीआयच्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. तर कृषी आणि मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी सरकारने पौष्टीक भारत लाँच करावी, असे एसबीआय अहवालात सूचविले आहे.

हेही वाचा-अ‍ॅमेझॉनकडून अब्ज डॉलरची गुंतवणूक, पियूष गोयल यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

इराणमधे होणार नाही बासमती तांदळाची निर्यात, कारण...

  • कर्नाल -अखिल भारतीय तांदूळ निर्यातदार संघटनेने इराणसह इतर देशातील निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत स्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत निर्यात थांबविण्याचा संघटनेने निर्णय घेतला आहे. तांदूळ निर्यातदारांना पैसे थकविले जाण्याची भीती आहे.

भारताचा आर्थिक विकासाचा दर २०२० मध्ये ६.६ टक्के राहील - यूनो
नवी दिल्ली - जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असताना नव्या आर्थिक वर्षात हीच स्थिती राहील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रसंघाने अहवालात व्यक्त केला आहे. तर देशाचा आर्थिक विकासाचा दर हा २०२० मध्ये ६.६ टक्के राहील, असा अंदाज केला आहे. त्याचबरोबर महागाईचा दर हा ४ टक्के राहील, असे संयुक्त राष्ट्रसंघाने अहवालात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details