मुंबई -सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी एअर आशियाच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे. चीनच्या उत्पादित मालावर लादलेले आयात शुल्क मागे घेण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. अशा विविध महत्त्वाच्या व्यापारविषयक बातम्यांचा हा आढावा...
पीसीए कार्यवाही काढून टाकण्यासाठी आयडीबीआय बँकेचे प्रयत्न
- मुंबई - एलआयसीची मालकी असलेली आयडीबीआय बँकेवर आरबीआयने मे २०१७ पासून त्वरित सुधारणा आकृतीबंध (पीसीए) लागू केला आहे. ही पीसीएची कार्यवाही काढून टाकण्यासाठी आयडीबीआयच्या अधिकाऱ्यांची आरबीआयबरोबर बैठक होणार असल्याचे सूत्राने सांगितले.
हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती; वाधवान पिता-पुत्र तुरुंगातच राहणार
ईडीने एअर आशियाच्या वरिष्ठाने पाठविले समन्स
- नवी दिल्ली - सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी एअर आशियाच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे. यामध्ये कंपनीचे मलेशियामधील वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी फर्नांडिस यांचा समावेश आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी हे समन्स पाठिवल्याचे ईडीमधील सूत्राने सांगितले.
हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांची 'एजीआर'वरील पुनर्विचार याचिका फेटाळली
पियूष गोयलांसह गुजरातचे मुख्यमंत्री तेजस एक्सप्रेसला दाखविणार हिरवा झेंडा-
- नवी दिल्ली - केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे दुसऱ्या तेजस एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. ही तेजस एक्सप्रेस भारतीय रेल्वे खाद्य आणि पर्यटन महामंडळाकडून (आयआरसीटीसी) मुंबई-अहमदाबाद मार्गावर चालविण्यात येणार आहे.
हेही वाचा-ओपोच्या एफ श्रेणीत 'हा' नवा स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फीचर
चीनबरोबर व्यापारी करार होवूनही ट्रम्प यांनी आयात शुल्क मागे घेण्यास दिला नकार
- वॉशिंग्टन - चीनच्या उत्पादित मालावर लादलेले आयात शुल्क मागे घेण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. विशेष म्हणजे चीनबरोबर पहिल्या टप्प्यातील करार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतली आहे.
'कार्यालयीन भाडे देण्याच्या व्यवसायात २०२० मध्ये वाढ होईल'
- नवी दिल्ली- देशातील सहा महानगरांमध्ये २०१९ मध्ये कार्यालये भाडे देण्याच्या व्यवसायात २२ टक्के वाढ झाल्याचे मालमत्ता सल्लागार कंपनी सॅव्हिल्सने म्हटले आहे. कॉर्पोरेट विशेषत: अमेरिकन कंपन्यांकडून मागणी वाढत असल्याचे २०२० मध्ये ७ ते ८ टक्के वाढ होईल, असे सॅव्हिल्सने म्हटले आहे.