वॉशिंग्टन- विकसनशील अर्थव्यवस्था असणाऱ्या देशामधील व्यक्तीची पहिल्यांदाच आयएमएफच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बल्गेरियाच्या ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवड होणे हा मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी दिली आहे. जागतिक अर्थव्यवस्था सातत्याने निराशाजनक असताना आयएमएफच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणे ही मोठी जबाबदारी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. व्यापारामधील राहिलेला तणाव आणि कर्जाच्या प्रमाणाची वाढलेली पातळी ही ऐतिहासिक (हिस्टॉरिक) आहे. विविध देशांवरील संकटाचे प्रमाण कमी करण्याला तातडीने प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अर्थव्यवस्थेचा दर कमी होताना त्यावर मात करण्यासाठी देशांनी तयार व्हावे, यालाही प्राधान्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-नियामक संस्थेच्या अनिश्चततेने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरला - आयएमएफ
ख्रिस्टिलिना (वय ६६) या ख्रिस्टीन लेगार्ड यांच्या जागी १ ऑक्टोबरपासून पदभार स्विकारणार आहेत. त्यांची नियुक्ती ५ वर्षासाठी असणार आहे.