मुंबई - राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाचे विकास प्रकल्प करण्यासाठी बांधकाम विकसकांना भागीदार म्हणून निमंत्रित केले आहे. ते म्हणाले, राज्य सरकार केवळ सुविधा उपलब्ध करून देणार नाही, तर प्रकल्पामधून मिळविणाऱ्या नफ्यासह जोखीम भागीदारीत घेणार आहे. ते सीआयआयच्या स्थावर मालमत्ता परिषदेत बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्या दिवशी पदभार घेतला त्या दिवशी मी विकसकांचा समर्थक (प्रो बिल्डर) असल्याचे जाहीर केले. परवडणाऱ्या दरातील घरांसाठी जे काही शक्य असेल ते करणार आहे. त्यामुळे मला वाटते, दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. बांधकाम विकसकांनी आमच्यासोबत येवून म्हाडामधील प्रकल्पांचे भागीदार व्हावे.
हेही वाचा-व्होडाफोन आयडियाने दूरसंचार विभागाला एजीआरचे दिले २,५०० कोटी रुपये