महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बीएसएनएलची खर्चाला कात्री; अधिकाऱ्यांना इकॉनॉमी वर्गातून विमान प्रवास करण्याचे आदेश

आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये बीएसएनलला १४ हजार २०२ कोटींचा तोटा होईल, असा अंदाज आहे. कमी दरामुळे दूरसंचार ऑपरेटर कंपन्यांमधील तीव्र स्पर्धा, कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च, ४ जी सेवेचा अभाव ही बीएसएनलच्या तोट्याची कारणे आहेत. अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी संसदेमध्ये दिली होती.

बीएसएनएल

By

Published : Jul 29, 2019, 7:51 PM IST

नवी दिल्ली - आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलने आर्थिक खर्चाला कात्री लावायला सुरुवात केली आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करताना इकॉनॉमी वर्गातूनच प्रवास करावा, असे बीएसएनलने आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सर्व कार्यालयीन दौरे करताना अधिकाऱ्यांनी इकॉनॉमी वर्गातून प्रवास करावा, असे आदेश दिले आहेत. व्यावसायिक आवश्यकता असेल तर बीएसएनएल सीएमडी यांच्या परवानगीने अधिकाऱ्यांना वरच्या वर्गातून प्रवास करता येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

असा आहे बीएसएनलचा आर्थिक तोटा

आर्थिक वर्ष तोटा (कोटी रुपयामध्ये)
२०१५-१६ ४, ८५९
२०१६-१७ ४,७९३
२०१७-१८ ७,९९३

आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये बीएसएनलला १४ हजार २०२ कोटींचा तोटा होईल, असा अंदाज आहे. कमी दरामुळे दूरसंचार ऑपरेटर कंपन्यांमधील तीव्र स्पर्धा, कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च, ४ जी सेवेचा अभाव ही बीएसएनलच्या तोट्याची कारणे आहेत. अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी संसदेमध्ये दिली होती.

सरकारी मालकी असलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही कंपन्या आर्थिक समस्येला तोंड देत आहेत. केंद्र सरकार दोन्ही कंपन्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी योजना आखत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details