महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

केरळ, महाराष्ट्रासह कर्नाटकच्या पूरग्रस्तांना नेटवर्कमध्ये मोफत कॉलिंग सेवा, या कंपनीने दिली ऑफर

बीएसएनएलवरून बीएसएनएलला करण्यात आलेले कॉल पूर्णपणे मोफत असणार आहेत. तर बीएसएनएलवरून दुसऱ्या मोबाईल ऑपरेटरला करण्यात आलेले कॉल २० मिनिटापर्यंत मोफत असणार आहेत.  ही ऑफर महाराष्ट्रातील सांगली आणि महाराष्ट्रातील नागरिकांना मिळू शकणार आहे.

बीएसएनएल

By

Published : Aug 11, 2019, 7:49 PM IST

Updated : Aug 11, 2019, 8:04 PM IST

नवी दिल्ली - पुराचा फटका बसल्याने केरळ, महाराष्ट्रासह कर्नाटकच्या काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा स्थितीमध्ये पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देणारा निर्णय बीएसएनएलने घेतला आहे. बीएसएनएलवरून बीएसएनएलला अर्मयादित मोफत कॉलिंग सेवा देण्याची कंपनीने घोषणा केली आहे. त्याचबरोबर १ जीबी डाटा आणि मोफत लघुसंदेशाची (एसएमएस) सेवा पुरग्रस्त भागातील ग्राहकांना देण्यात येणार आहे.

बीएसएनएलवरून बीएसएनएलला करण्यात आलेले कॉल पूर्णपणे मोफत असणार आहेत. तर बीएसएनएलवरून दुसऱ्या मोबाईल ऑपरेटरला करण्यात आलेले कॉल २० मिनिटापर्यंत मोफत असणार आहेत. ही ऑफर महाराष्ट्रातील सांगली आणि महाराष्ट्रातील नागरिकांना मिळू शकणार आहे.

बीएसएनएलचे चेअरमन पी.के.पुरवार म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमध्ये ग्राहकांना सेवा देत आहोत. मात्र या जिल्ह्यात सेवा सुरू ठेवण्यासाठी कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. जर मोबाईल टॉवर हे पाण्यात गेले असेल तर सेवेत अडथळा येतो. तसेच भूस्खलन आणि पुरामुळे ऑप्टिकल फायबरचे नुकसान झाल्याच संपर्कात अडथळा येतो, असे त्यांनी सांगितले. एअरटेल, व्होडाफोन आयडियाने केवळ केरळमधील पुरग्रस्तांसाठी ऑफर दिली आहे. हरविलेल्या नागरिकांना शोध घेण्यासाठी एअरटेलने १९४८ ही मोफत हेल्पलाईनही सुरू केली आहे.

Last Updated : Aug 11, 2019, 8:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details