महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बीएसएनएलची धमाकेदार ऑफर, तुम्ही म्हणाल घरी बसूनच काम करेन.... - बीएसएनएल ऑफर

बीएसएनएलच्या नव्या ग्राहकांना कॉपर केबलचे कनेक्शन घेण्याचा पर्याय आहे. त्यासाठी ग्राहकांना इन्स्टॉलेशनसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. मात्र, मोडेमसाठी पैसे द्यावे लागणार असल्याचे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीएसएनएल
बीएसएनएल

By

Published : Mar 20, 2020, 7:51 PM IST

नवी दिल्ली- कोरोनाच्या धसक्याने अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. ही बाब लक्षात घेवून सरकारी कंपनी बीएसएनएलने धमाकेदार ऑफर आणली आहे. बीएसएनएलने लँडलाईन असलेल्या जुन्या व नव्या ग्राहकांना मोफत ब्रॉडबँडची ऑफर देऊ केली आहे.

बीएसएनएलच्या नव्या ग्राहकांना कॉपर केबलचे कनेक्शन घेण्याचा पर्याय आहे. त्यासाठी ग्राहकांना इन्स्टॉलेशनसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. मात्र, मोडेमसाठी पैसे द्यावे लागणार असल्याचे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बीएसएनएलचे संचालक विवेक बन्झल म्हणाले, ज्यांच्याकडे बीएसएनएल लँडलाईन आहे, अशा सर्व ग्राहकांना एक महिना मोफत ब्रॉडबँड सेवा देण्यात येईल. त्यामुळे त्यांना घरून काम करणे शक्य होईल. तसेच घरी राहून इतरांना शिक्षण देण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांना घराच्या बाहेर जाण्यासाठी कमीत कमी वेळा जावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-बंदमधून शेअर बाजाराला वगळले; बँकांचेही व्यवहार राहणार सुरू

मोफत ब्रॉडबँडची ऑफर नव्या ग्राहकांना लागू आहे. एक महिन्यानंतर ग्राहकांना सशुल्क प्लॅन सुरू होणार आहे. जे ग्राहक ऑप्टिकल फायबरची कनेक्टिव्हिटी घेणार आहेत, त्यांनाच इन्स्टॉलेशनचे पैसे द्यावे लागणार आहेत.

हेही वाचा-गृहकर्जाचे १२ महिन्यांचे मासिक हप्ते स्थगित करा - एमसीएच-क्रेडाईची सरकारकडे मागणी

दरम्यान, बीएसएनएलने आर्थिक संकटात असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची योजना लागू केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details