मुंबई - देशातील सर्वात मोठा शेअर बाजार असलेल्या मुंबई शेअर बाजाराने महत्त्वाचा मैलाचा दगड गाठला आहे. मुंबई शेअर बाजारातील गुंतवणुकदारांची संख्या 10 कोटी झाली ( BSE registered investor accounts ) आहे. ही माहिती मुंबई शेअर बाजाराचे सीईओ आशिष चौहान ( BSE CEO Ashish Chauhan ) यांनी बुधवारी दिली आहे.
गेल्या 91 दिवसांत मुंबई शेअर बाजारातील गुंतवणुकदारांची संख्या 1 कोटीने वाढून 10 कोटी झाली ( 10 crore milestone ) आहे. तर मुंबई शेअर बाजारात 15 डिसेंबर 2021 रोजी गुंतवणुकदारांची संख्या ( BSE investors account ) 9 कोटी झाली होती. एक कोटी गुंतवणुकदारांची संख्या वेगाने झाली आहे. केवळ 91 दिवसांत गुंतवणुकदारांची संख्या 1 कोटीने वाढली ( 1 crore investor accounts ) आहे. मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे भांडवली मूल्य हे 2,54,45,122.12 कोटी रुपये असल्याचे चौहान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.