महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनाने देशातील सर्व वाहन कंपन्यांच्या उत्पादनाला 'ब्रेक'

ह्युदांई मोटर इंडियाने २३ मार्चपासून उत्पादनाचे कामे बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले. उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्ही सरकारच्या अधिसुचनेची वाट पाहणार आहोत, असे कंपनीने म्हटले आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : Mar 23, 2020, 12:27 PM IST

चेन्नई - आधीच मंदीच्या फेऱ्यात सापडलेल्या वाहन कंपन्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उत्पादनाला ब्रेक लावला आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची वाहन कंपनी ह्युदांई मोटर इंडिया, टीव्हीएस मोटर, आयशर मोटर आणि सुझुकी मोटरसायकलने उत्पादन प्रकल्प बंद केले आहेत.

ह्युदांई मोटर इंडियाने २३ मार्चपासून उत्पादनाचे कामे बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले. उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्ही सरकारच्या अधिसुचनेची वाट पाहणार आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. या कंपनीमधून दर वर्षी १ लाख वाहनांचे उत्पादन घेण्याची क्षमता आहे.

हेही वाचा-VIDEO : 'कोरोना'मुळे उघडताच गडगडला शेअर बाजार; कारण जाणून घ्या तज्ज्ञांकडून..

टीव्हीएस मोटरने सर्व उत्पादन प्रकल्प आणि कामकाज तसेच कार्यालये सोमवारपासून दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयशर मोटरने २३ मार्च ते ३१ मार्च २०२० पर्यंत जगभरातील सर्व उत्पादन प्रकल्प बंद करणार असल्याचे जाहीर केले. यामध्ये चेन्नईमधील उत्पादन प्रकल्प व देशातील सर्व डीलरशीपची शोरुम व कार्यालये बंद ठेवण्याचे जाहीर केले.

हेही वाचा- शेअर बाजार ३,१८२ अंशांनी आपटला; गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी पाण्यात

मारुती सुझुकी इंडिया, होंडा कार, महिंद्रा अँड महिंद्रा व फियाट कंपनीने तात्पुरत्या काळासाठी उत्पादन बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले. तर हिरो मोटोकॉर्प, होंडा मोटरसायकल, स्कूटर इंडिया आणि सुझुकी मोटरसायकल इंडियानेही वाहन प्रकल्प बंद केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details