महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

खासगीकरणापूर्वी बीपीसीएलकडून १२,५८१ कोटी लाभांश जाहीर; निम्मा केंद्राला मिळणार - Net profit of BPCL

केंद्र सरकारकडून बीपीसीएलमधील सर्व ५२.९८ टक्के हिस्सा विकण्यात येणार आहे. या हिश्यापोटी केंद्र सरकारला ६,६६५.७६ कोटी रुपयांचा लाभांश मिळणार आहे.

BPCL
बीपीसीएल

By

Published : May 26, 2021, 9:55 PM IST

नवी दिल्ली- खासगीकरणाच्या वळणावर पोहोचलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने आज १२,५८१ कोटी रुपये हा विक्रमी लाभांश जाहीर केला. त्यामधील निम्म्याहून अधिक लाभांश हा केंद्र सरकारला मिळणार आहे.

बीपीसीएलने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार संचालक मंडळाने प्रति इक्विटी शेअरला अंतिम ५८ रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. या निर्णयाला समभागधारकांची मंजुरी मिळवावी लागणार आहे. हा निर्णय मंजूर झाला तर एकूण १२,५८१.६६ कोटी लाभांश होणार आहे. त्यामध्ये ७५९२.३८ कोटी रुपयांचा विशेष लाभांश असणार आहे.

केंद्र सरकारकडून बीपीसीएलमधील सर्व ५२.९८ टक्के हिस्सा विकण्यात येणार आहे. या हिश्यापोटी केंद्र सरकारला ६,६६५.७६ कोटी रुपयांचा लाभांश मिळणार आहे. यापूर्वीच कंपनीने प्रति शेअर २१ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

हेही वाचा-नवीन डिजीटल कायदा; अंमलबजावणीचा अहवाल द्या, केंद्राचे सोशल मीडिया कंपन्यांना आदेश

रिफायनरीमधील हिस्सा विकल्याने नफ्यात प्रचंड वाढ-

कंपनीने विक्रमी लाभांश जाहीर करण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. मात्र, कंपनीला आसाममधील नुमालीगढ रिफायनरीचा ६१.५ टक्के हिस्सा विकून ९,८७६ कोटी रुपये मिळाले आहेत. बीपीसीएलला आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १९,०४१.६७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. कंपनीला आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये २,६८३.१९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला होता.

हेही वाचा-फेसबुकसह इन्स्टाग्रामवरील लाईकचे बटन होणार गायब!

बीपीसीएलचे देशात १५ हजार ७८ पेट्रोल पंप

दरम्यान, बीपीसीएलच्या हिस्सा खरेदी करण्यासाठी जगातील मोठ्या तेल आणि वायू कंपन्यांनी रस दाखविला आहे. बीपीसीएलचे भांडवली मूल्य हे ९७ हजार २४७ कोटी रुपये आहे. तर सरकारची कंपनीमध्ये असलेल्या हिश्श्याची किंमत ५१ हजार ५०० कोटी रुपये आहे. बीपीसीएलचे मुंबई, कोची (केरळ), बिना (मध्यप्रदेश), नुमालीगढ(आसाम) येथे तेलशुद्धीकरण केंद्र आहेत. तर बीपीसीएलचे देशात १५ हजार ७८ पेट्रोल पंप आहेत. तर ६ हजार ४ एलपीजी वितरक आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details