हैदराबाद– चीनबरोबर तणावाची स्थिती असताना देशात चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे. यावर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले, की भारताने जास्ती प्रमाणात आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. पण, भारत जगापासून स्वत:ला वेगळे करू शकत नाही.
'उत्पादनांवर बहिष्कार टाकून चीनच्या अर्थव्यवस्थेला बसणार नाही झळ' - पी चिदंबरम न्यूज
जागतिक पुरवठा साखळीमध्ये यापुढेही भारताने राहिले पाहिजे. चिनी उत्पादनांवर बंदी घालता कामा नये. चीनचा जगाबरोबर किती व्यापार आहे? त्या तुलनेत भारताबरोबर चीनचा किती व्यापार आहे? हे प्रमाण नगण्य असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जागतिक पुरवठा साखळीमध्ये यापुढेही भारताने राहिले पाहिजे. चिनी उत्पादनांवर बंदी घालता कामा नये. चीनचा जगाबरोबर किती व्यापार आहे? त्या तुलनेत भारताबरोबर चीनचा किती व्यापार आहे? हे प्रमाण नगण्य असल्याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधले. पुढे चिदंबरम म्हणाले, की चिनी मालांवर बहिष्कार टाकून चीनच्या अर्थव्यवस्थेला झळ बसणार नाही. भारताच्या संरक्षणासारख्या संवेदनशील विषयाची चर्चा सुरू असताना आपण बहिष्कारासारखे मुद्दे पुढे आणू नये.
भारताच्या लडाखच्या भूभागात कोणताही बाहेरील व्यक्ती नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र यांनी म्हटले. त्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले, की पंतप्रधान मोदींचे विधान हे सर्वांना गोंधळात आणि आश्चर्यात टाकणारे आहे.या दाव्याला सरकारचे काय उत्तर आहे? आता, चीन संपूर्ण गलवान खोऱ्यावर दावा सांगत आहे. त्याला सरकार विरोध करणार का, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. चीनने आज केलेल्या दाव्याला जर भारत सरकारने फेटाळले नाही, तर त्याचे भयंकर परिणाम असू शकतात, असा चिदंबरम यांनी इशारा दिला.