महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बँक ऑफ बडोदाचे कर्ज स्वस्त, व्याजदरात केली कपात - MCLR

आरबीआयच्या धोरण समितीने ६ जुनला रेपो दरात पाव टक्के कपात केली होती. त्यामुळे रेपो दर ६ टक्क्यांवरून ५.७५ टक्के झाला आहे. याचा लाभ बँकांनी ग्राहकांना द्यावा, अशी सूचना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली होती.

बँक ऑफ बडोदा

By

Published : Jul 6, 2019, 12:45 PM IST

नवी दिल्ली - बँक ऑफ बडोदाने एमसीएलआरमध्ये १० बेसिस पाँईटने म्हणजे ०.१ टक्क्याने कपात केली आहे. त्यामुळे गृह कर्ज, कार आणि वैयक्तिक कर्जांचे व्याजदर कमी होणार आहेत. या नव्या व्याजदराची रविवारीपासून अंमलबजावणी होणार आहे.

बँक ऑफ बडोदाने वर्षभरापूर्वी एमसीएलआर १० बेसिस पाँईटने कमी केला होते. त्यामुळे एमसीएलआर ८.७० टक्क्यावरून ८.६० टक्के झाला होता. सध्या एमसीएलआरचा नवा दर ८.३० आणि ८.४० टक्के होणार आहे.

आरबीआयने रेपो दरात केली कपात-
आरबीआयच्या धोरण समितीने ६ जुनला रेपो दरात पाव टक्के कपात केली होती. त्यामुळे रेपो दर ६ टक्क्यांवरून ५.७५ टक्के झाला आहे. याचा लाभ बँकांनी ग्राहकांना द्यावा, अशी सूचना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली होती.

गेल्या महिन्यात बँक ऑफ महाराष्ट्र आणि ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्सने एमसीएलआरच्या दरात कपात केली होती. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने कॅश क्रेडिट आणि १ लाखापर्यंतच्या ओव्हरड्राफ्टवरील व्याजदरात कपात केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details