महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

लडाखमध्ये मोठा सौर प्रकल्प होणार सुरू; भाजप खासदाराने 'या' घातल्या अटी - Ladakh Developement

लडाखमधील पर्यावरणाची स्थिती खूप संवेदनशील असून त्याचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे खासदार जामयांग शेरिंग नामग्याल यांनी सांगितले. गुंतवणूकदारांनी त्यांच्या फायद्यामधील रक्कम स्थानिकांना रॉयल्टी म्हणून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

भाजपचे खासदार जामयांग शेरिंग नामग्याल

By

Published : Sep 15, 2019, 6:30 PM IST

Updated : Sep 16, 2019, 1:21 PM IST

लेह- लडाखच्या लोकसभेचे प्रतिनिधीत्व करणारे भाजपचे खासदार जामयांग शेरिंग नामग्याल यांनी नव्या येऊ घातलेल्या सौर उर्जाप्रकल्पाचे स्वागत केले आहे. मात्र, त्यासाठी स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात यावे, अशी खासदार नामग्याल यांनी अट घातली आहे. तसेच ५० हजार कोटींच्या प्रकल्पाला देण्यात येणारी जमीन ही केवळ भाडेतत्वावर असावी, अशी अट घातली आहे.

लडाखमधील पर्यावरणाची स्थिती खूप संवेदनशील असून त्याचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे खासदार जामयांग शेरिंग नामग्याल यांनी सांगितले. गुंतवणूकदारांनी त्यांच्या फायद्यामधील रक्कम स्थानिकांना रॉयल्टी म्हणून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा-एसबीआयच्या शाखेचे लडाखमध्ये १० हजार फूट उंचीवरील गावात उद्घाटन

केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचे ३७० हे कलम रद्द केल्यानंतर लडाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आला आहे. येथे ५० हजार कोटींचा सौर उर्जाप्रकल्प सुरू होणार असल्याचे वृत्त काही माध्यमामध्ये आले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना नामग्याल म्हणाले, बाहेरून येणारी गुंतवणूक ही खूप महत्त्वाची आहे. मी त्यांचे स्वागत करतो, मात्र काही अटी आहेत. आम्ही तुमच्या नावाने जमीन देवू शकत नाही. लडाखमध्ये मोठ्य़ा प्रमाणात सौर उर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. या प्रदेशाकडे पडीक जमिनीचा तुकडा म्हणून पाहू नये. तर पर्यटनस्थळ आणि औषधी वनस्पतीची मुबलकतादेखील येथे आहे.

हेही वाचा-'कोळसा खाण कामगारांचा संप रोखण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक ठरणार'

Last Updated : Sep 16, 2019, 1:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details