बंगळुरू– कोरोनावर बाजारात औषध उपलब्ध करणाऱ्या बिकॉनच्या चेअरमन किरण मुझुमदार-शॉ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे.
किरण मुझुमदार-शॉ यांनी ट्विटमध्ये म्हटले, की कोरोनाची लागण झाल्याने मी कोरोनाबाधितांच्या संख्येत भर टाकली आहे. सौम्य लक्षणे आहेत. ते तसेच प्रमाण राहिल, अशी मला आशा आहे. त्यावर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी ट्विटला प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की ऐकून दु:ख वाटले. तुम्ही लवकर बरे होण्याची गरज आहे. लवकरे बरे व्हा.
कर्नाटकमध्ये कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या बंगळुरूमध्ये -
दरम्यान, कर्नाटकमध्ये 17 ऑगस्टला सायंकाळपर्यंत एकूण 2 लाख 33 हजार 283 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 4 हजार 62 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या महामारीवर 1 लाख 48 हजार 562 जणांनी मात केल्याचे कर्नाटकच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनाच्या रुग्णांचे सर्वाधिक प्रमाण हे बंगळुरूमध्ये आहे. बंगळुरूमध्ये आजवर 91 हजार 864 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.