नवी दिल्ली - बायोकॉनच्या प्रमुख किरण मुझुमदार शॉ यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांच्या विधानाला बायोकॉनच्या प्रमुख किरण मुझुमदार-शॉ यांनी पाठिंबा दिला आहे. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी विज्ञानावर आधारित नेतृत्व हवे, अशी सौम्या यांनी मागणी केली होती.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी २२ मे रोजी कार्यक्रमात बोलताना कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणताना सहानुभूती आणि विनम्र दृष्टीकोनाचे महत्व व्यक्त केले होते. त्यावर किरण मुझुमदार-शॉ यांनी आज ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की डॉक्टर सौम्या यांच्या मताशी सहमत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्याकरिता विज्ञानावर आधारित नेतृत्व, धोरण आणि पुराव्यावर आधारित मार्गदर्शक सूचनांची गरज आहे.
हेही वाचा-विशाखापट्टणम येथील एचपीसीएल रिफायनरीमध्ये भीषण आग
पारदर्शकता आणल्यास नागरिक संयमाने लशींची वाट पाहू शकतील
मुझुमदार-शॉ या बायोकॉन या जैवतंत्रज्ञान कंपनीच्या कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यांनी यापूर्वी कोरोनाच्या स्थितीचे वर्णन विवाहाप्रमाणे केले होते. सध्याच्या लसीकरणाच्या प्रक्रियेने गोंधळ निर्माण झाल्याचेही मुझुमदार यांनी म्हटले होते. देशातील कोरोना लशींचा साठा कमी असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली होती. लशींच्या साठ्याबाबत केंद्र सरकारने अधिक पारदर्शकता आणावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. पारदर्शकता आणल्यास नागरिक संयमाने लशींची वाट पाहू शकतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले होते.
हेही वाचा-कर्जतमधील कोरोना योद्ध्यांना बारामती अॅग्रोची 'ऊर्जा'
देशात मंदगतीने लसीकरण सुरू-
केंद्र सरकारने १ मेपासून कोरोना लसीकरण हे १८ वर्षांहून अधिक वयोगटासाठी जाहीर केले आहे. मात्र, देशात लशींचा साठा कमी असल्याने लसीकरण मोहिम मंदगतीने सुरू आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणाविरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत.