नवी दिल्ली -बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) आयपीओ यंदा दिवाळीत खुला होणार आहे. ही माहिती केंद्रीय निर्गुंतवणूक सचिव तुहीन कांत पांडे यांनी दिली आहे.
केंद्रीय निर्गुंतवणूक सचिव तुहीन कांत पांडे म्हणाले की, एलआयसी ही केंद्र सरकारची गुंतागुंतीची कंपनी आहे. मात्र, केंद्र सरकार आव्हान म्हणून ऑक्टोबरनंतर आयपीओ खुला करणार आहे. आयपीओ ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या सुमारास खुला होणार आहे. एलआयसीवर लोकांचा विश्वास आहे. हा विश्वास तुटू द्यायचा नसल्याचे पांडे यांनी सांगितले. एलआयसीचा आयपीओ खुला होण्यासाठी केंद्र सरकारने वित्तीय विधेयक २०२१ मध्ये सुधारणा केल्या आहेत. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पात एलआयसीचा आयपीओ आणण्यासाठीही मंजुरी देण्यात आलेली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना सार्वजनिक कंपन्यांचे निर्गुंतवणूक धोरण जाहीर केले आहे.
एलआयसीच्या आयपीओमधून केंद्र सरकारला 2.10 लाख कोटी मिळण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा-महिंद्राने परत मागविले १,५७७ डिझेल थर वाहने; इंजिनमध्ये आढळला दोष