महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आरबीआयच्या रेपो दराप्रमाणे एसबीआय बचत खात्यासह कर्जावर आकारणार व्याज - रेपो दर

बचत खाते आणि कर्ज प्रकरणे रेपो दराशी संलग्न करण्याची अंमलबजावणी एसबीआय १ मेपासून करणार आहे. १ लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम बचत खात्यावर असणाऱ्या ग्राहकांना हा फायदा मिळणार आहे.

एसबीआय

By

Published : Mar 9, 2019, 5:16 PM IST

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकने रेपो दरात कपात केल्यानंतरही बँका त्याचा फायदा ग्राहकांना देत नाही. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) रेपो दरातील कपातीचा फायदा बचत खाते असणाऱ्या आणि कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील पहिली बँक ठरली आहे.

बचत खाते आणि कर्ज प्रकरणे रेपो दराशी संलग्न करण्याची अंमलबजावणी एसबीआय १ मेपासून करणार आहे. १ लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम बचत खात्यावर असणाऱ्या ग्राहकांना हा फायदा मिळणार आहे. आरबीआयचा सध्या ६.२५ टक्के रेपो दर आहे. जे कर्ज बँका आरबीआयकडून घेतात त्यावर घेण्यात येणाऱ्या कर्जावर आकारलेले जाणारे व्याज हा रेपो दर म्हणून ओळखला जातो. एसबीआयने हा स्वत:हून हा निर्णय घेतला आहे. रेपो दर कमी केल्यानंतर बँकांनीही व्याजदर कमी करावे, अशी सूचना गेल्या महिन्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली होती.


ABOUT THE AUTHOR

...view details