महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोव्हॅक्सिनची लस ७७.८ टक्के लस कार्यक्षम; तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष - Covaxin efficacy in Phase third

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीबाबत अनेकदा प्रश्न विचारण्यात आले होते. कंपनीने तिसऱ्या टप्प्याची माहिती सरकारला दिल्याने शंकांना पूर्णविराम मिळालेला आहे. भारत बायोटेकने आयसीएमआरच्या मदतीने कोव्हॅक्सिन विकसित केली आहे.

Covaxin
कोव्हॅक्सिन

By

Published : Jun 22, 2021, 9:06 PM IST

नवी दिल्ली - भारत बायोटेकने उत्पादित केलेली कोव्हॅक्सिन ही कोरोनावर ७७.८ टक्के कार्यक्षम असल्याचे औषधी नियंत्रकांच्या अधिपत्याखालील विषय तज्ज्ञ समितीला आढळले आहे. सुत्राच्या माहितीनुसार हैदराबादमधील भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीची आकडेवारी ही भारतीय औषध नियंत्रक महासंचालनयाकडे माहिती दिली आहे.

कोरोना लशीला मंजुरी देण्यासाठी भारत बायोटेकने जागतिक आरोग्य संघटनेनेकडे अर्ज केला आहे. भारतात कोव्हिशिल्ड, स्पूटनिकसह कोव्हॅक्सिनच्या लशीला परवानगी दिलेली आहे. कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीबाबत अनेकदा प्रश्न विचारण्यात आले होते. कंपनीने तिसऱ्या टप्प्याची माहिती सरकारला दिल्याने शंकांना पूर्णविराम मिळालेला आहे. भारत बायोटेकने आयसीएमआरच्या मदतीने कोव्हॅक्सिन विकसित केली आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या डेल्टा प्लसचा देशात पहिला मृत्यू ; ३ राज्यांत नव्या स्ट्रेनचे ३० रुग्ण

कोव्हॅक्सिनची लहान मुलांवर चाचणी-

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचे कित्येक संशोधकांचे म्हणणे आहे. ही लाट कधी येईल याबाबत कोणालाही अंदाज नसला, तरी तिला तोंड देण्याच्या दृष्टीने आतापासूनच प्रयत्न करण्यात येत आहेत. कोव्हॅक्सिन या कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकने आता लहान मुलांवरील क्लिनिकल चाचण्या सुरू करण्याबाबत संकेत दिले आहेत. जून महिन्यापासून या चाचण्या सुरू होणार आहेत, असे कंपनीच्या बिझनेस डेव्हलपमेंट अँड इंटरनॅशनल अ‌ॅडव्होकसी प्रमुख डॉ. राचेस एल्ला यांनी नुकतेच सांगितले.

हेही वाचा-लशीच्या उपलब्धतेचा प्रश्न होणार नाही; पुढील महिन्यात मिळणार २० ते २२ कोटी डोस

ABOUT THE AUTHOR

...view details