नवी दिल्ली - भारत बायोटेकने कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी १३ हजार स्वयंसेवकांची भरती केली आहे. भारत बायोटेकने एकूण २६ हजार स्वयंसेवकांची भरती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे स्वयंसेवक देशभरातील विविध शहरामधून निवडले जाणार आहे.
भारत बायोटकने कोवॅक्सिन ही कोरोनावरील लस शोधून काढली आहे. या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये सुरक्षा आणि प्रतिकारक्षमता निर्माण करणारे आश्वासक परिणाम दिसून आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-भारत 'स्पुटनिक व्ही'च्या 300 दशलक्ष डोसची करणार निर्मिती : आरडीआयएफ
कोरोना लसीवरील ३०० दशलक्ष डोसची निर्मिती-
कोरोना लस ही इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलीजी (एनआयव्ही) यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आली आहे. कोवॅक्सिन ही अत्यंत शुद्ध आणि सार्स-कोव्हिड-२ वर प्रभावी आहे. सुरक्षिततेसाठी अत्यंत दक्षता घेवून ३०० दशलक्ष डोस तयार केल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. ही लस भारत बायोटेक बीएसएल-३, बायोकंटेन्टमेंट या हैदराबादमधील सुविधा केंद्रात उत्पादित करण्यात आली आहे.
हेही वाचा-दिलासादायक..! ब्रिटन पाठोपाठ अमेरिकेत कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात
कोरोना लसीची भारतामधील ही अभूतपूर्व चाचणी आहे. आम्हाला चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे भारत बायोटेकचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एल्ला यांनी सांगितले. कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत.