महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'ईसीएलजीएस योजनेमधून 77 हजार 613 कोटी रुपयांचे कर्जवाटप' - ECLGS distribution in July

कोरोनाच्या महासंकटात दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज घोषित केले. यामध्येही इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ईसीएलजीएस) योजनेचा समावेश आहे. ईसीएलजीएस योजनेमधून एमएसएमई क्षेत्राकरिता विनातारण कर्ज देण्यात येते.

निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन

By

Published : Jul 22, 2020, 1:33 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने ईसीएलजीएस योजनेमधून 20 जुलैपर्यंत 77 हजार 613 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. या योजनेकरिता एक लाख 27 हजार 582.60 कोटी रुपये मंजूर झाले होते. ही माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून दिली आहे.

सरकारी बँकांनी ईसीएलजीएस योजनेमधून 70 हजार 894.19 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यामधील 25 हजार 797. 29 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 15 जुलै 2000 23 जुलै 2000 पर्यंत एकूण नऊ हजार 301 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाल्याची माहिती निर्मला सीतारमण यांच्या कार्यालयाने दिली आहे.

कोरोनाच्या महासंकटात दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज घोषित केले. यामध्येही इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ईसीएलजीएस) योजनेचा समावेश आहे. ईसीएलजीएस योजनेमधून एमएसएमई क्षेत्राकरिता विनातारण कर्ज देण्यात येते.

काय आहे ईसीएलजीएस योजना?

  • गेल्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २१ लाख कोटींच्या पॅकेजमध्ये एमएमएमई उद्योगांना आपात्कालीन कर्ज योजना हमी (ईसीएलजीएस) जाहीर केली होती. या योजनेद्वारे राष्ट्रीय कर्ज हमी विश्वस्त कंपनीकडून (एनसीजीटीसी) एमएमएमई उद्योगांना कर्जाची १०० टक्के हमी दिली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details