महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आर्थिक वर्षाखेर बँक क्षेत्रातील एनपीए स्थितीत सुधारणा होईल- एसबीआय चेअरमन - Convention of industry chamber FICCI

पायाभूत आणि उपभोक्त्यांना कर्ज देण्यासाठी बँकिंग क्षेत्रात संधी आहेत. उपभोक्त्यांची मागणी फारशी कमी झाली नसल्याचे रजनीश कुमार यांनी सांगितले.

SBI chairman
एसबीआय चेअरमन रजनीश कुमार

By

Published : Dec 21, 2019, 4:54 PM IST

नवी दिल्ली- बुडीत कर्जाचा विचार करता मार्च अखरे बहुतांश बँकांची स्थिती चांगली राहील, असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सांगितले. कर्ज देण्यासाठी वित्तपुरवठ्यात कमतरता नसल्याचेही त्यांनी सांगितले. ते फिक्कीच्या ९२ व्या वार्षिक परिषदेमध्ये बोलत होते.


पायाभूत आणि उपभोक्त्यांना कर्ज देण्यासाठी बँकिंग क्षेत्रात संधी आहेत. उपभोक्त्यांची मागणी फारशी कमी झाली नसल्याचे रजनीश कुमार यांनी सांगितले. पतधोरणाप्रमाणे बँका प्रमाणाहून व्याजदर कमी करू शकत नाहीत. कारण त्यांच्यावर मालमत्तेचे उत्तरदायित्व असते. व्यवस्थेत भांडवलाची कमतरता नाही. मात्र, कॉर्पोरेट पुरेसे कर्ज घेत नाही. तसेच, त्यांच्या क्षमतांचा वापर करत नाहीत.

हेही वाचा-केंद्र सरकारने थकविली ईसीएचएसची रक्कम; रुग्णालये थांबविणार विनारोकड सेवा

स्पेक्ट्रमसाठी कर्ज देणे असुरक्षित-
आगामी स्पेक्ट्रमच्या तोंडावर बँकांकडून दूरसंचार कंपन्यांना कर्ज देण्यावर विचारले असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली. दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रमसाठी कर्ज देणे आमच्यासाठी पूर्णपणे असुरक्षित आहे. सरकारकडून स्पेक्ट्रमचा लिलाव कागदोपत्री सुरक्षित होणार आहे. मात्र, व्यावहारिकदृष्ट्या पूर्णपणे असुरक्षित आहे. अशा स्थितीत बँकांना कर्ज देण्यापूर्वी काळजीपूर्वक मूल्यांकन करावे लागणार आहे. कारण कर्ज थकित राहण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा-गुगलमध्ये सुंदर पिचाईंचे 'नवे युग'; दुप्पट वेतनासह कोट्यवधी रुपयांचे मिळणार शेअर

ABOUT THE AUTHOR

...view details