महाराष्ट्र

maharashtra

सौदी अरेबियाच्या मध्यवर्ती बँकेकडून बँक ऑफ बडोदाला १३ कोटींचा दंड

By

Published : Jan 25, 2021, 10:22 PM IST

सौदी अरेबियामध्ये मनी लाँड्रिग आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरविण्याच्या विरोधात कठोर कायदे आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर बँकांसह वित्तीय संस्थांना दंड ठोठावण्यात येतो.

बँक ऑफ बडोदा न्यूज
बँक ऑफ बडोदा न्यूज

नवी दिल्ली- सेंट्रल बँक ऑफ द युनायटेड अरब एमिरेट्सने बँक ऑफ बडोदाला १३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मनी लाँड्रिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे.

सौदी अरेबियामध्ये मनी लाँड्रिग आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरविण्याच्या विरोधात कठोर कायदे आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर बँकांसह वित्तीय संस्थांना दंड ठोठावण्यात येतो. या नियमाचे उल्लंघन केल्याने बँक ऑफ बडोदाला - सेंट्रल बँक ऑफ द युनायटेड अरब एमिरेट्सने बँक ऑफ बडोदाला १३ कोटींचा दंड ठोठावला आहे.

हेही वाचा-प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवर ग्रीन कर; केंद्राचा प्रस्ताव

बँक ऑफ बडोदा आवश्यक त्या नियमांचे पालन करण्यासाठी पावले उचलत आहे. त्यासंदर्भात सौदी अरेबियाच्या मध्यवर्ती बँकेबरोबर संवाद करत असल्याचे बँक ऑफ बडोदाने म्हटले आहे. नियमांच्या पालन करण्यात अनेक सुधारणा केल्याचेही बँक ऑफ बडोदाने म्हटले आहे. या आर्थिक दंडाविरोधात अपील दाखल करण्याचेही संकेत सरकारी बँकेने दिले आहे.

हेही वाचा-नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांवर कारवाई करा-सीएआयटीची मागणी

दरम्यान, आरबीआयनेही अनेकदा नियमांचे पालन न केल्याने खासगी तसेच सरकारी बँकांना दंड ठोठावले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details