मुंबई -कोरोनाच्या संकटात दिलासा देण्यासाठी सरकारी बँकांनी कर्जवाटप करण्यास सुरुवात केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने एमएसएमई, स्वयं सहाय्यता बचत गट, कृषी आणि किरकोळ विक्रेत्यांना २ हजार ७८९ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. ही मदत गेल्या तीन महिन्यात कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे.
कोरोनाच्या आपत्कालीन संकटामुळे बँक ऑफ महाराष्ट्राने मार्चपासून ग्राहकांना मार्चपासून कर्जवाटप करण्यास सुरुवात केली आहे. मार्च २०२० ते मे २०२० दरम्यान सुमारे एक लाभार्थ्यांना कर्जवाटप केल्याचे बँक ऑफ महाराष्ट्राने म्हटले आहे.