नवी दिल्ली- बँक ऑफ महाराष्ट्रने व्हिडिओकॉन ग्रुपच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. व्हिडिओकॉनवर १५३.७७ कोटींचे कर्ज थकित आहे. या ग्रुपच्या मालकीच्या असलेल्या युनिटी अप्लायन्सेसच्या मालमत्तेचा ३० मार्चला लिलाव होणार आहे.
युनिटी अप्लायन्सेसवर १५३.७७ कोटींचे कर्ज आणि व्याज ५ जानेवारी २०१८ पासून थकित आहे. ही कंपनी एसआयपीसीओटी इंडस्ट्रीयल कॉम्पलेक्स येथे आहे. व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज ग्रुपचे प्रमोटर वेणुगोपाल धूत आणि पी.एन. धूत हे युनिट अप्लायन्सेसच्या कर्जाला जामिनदार आहेत. या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया ३० मार्च २०१९ ला होणार आहे.
कर्ज थकबाकीदार व्हिडिओकॉन ग्रुपच्या मालमत्तेचा बँक ऑफ महाराष्ट्र करणार लिलाव - व्हिडिओकॉन
युनिटी अप्लायन्सेसवर १५३.७७ कोटींचे कर्ज आणि व्याज ५ जानेवारी २०१८ पासून थकित आहे. ही कंपनी एसआयपीसीओटी इंडस्ट्रीयल कॉम्पलेक्स येथे आहे.
प्रतिकात्मक
जमिनीसाठी ४२.३४ कोटी तर प्लांटसह मशिनरीसाठी ७२.८२ कोटी रुपये बँकेकडून राखीव ठेवण्यात आली आहे. बँक व्हिडिओकॉनची मालमत्तेची दुसऱ्यांदा ई-लिलाव प्रक्रिया सुरू करणार आहे. आरबीआयने देशातील सर्वात मोठ्या २८ थकबाकीदारांपैकी एक व्हिडिओकॉन असल्याचे निश्चित केले आहे. तर व्हिडिओकॉन ग्रुप हा दिवाळखोरी प्रक्रियेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.